शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांशी शेट्टी यांची भेट संविधान मोर्चा तयारी : राजकीय चर्चा झाली नसल्याचे सूत्रांचे म्हणणे; ‘संविधान बचाव’च्या भूमिकेतून नेते एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 01:12 IST

कोल्हापूर : सर्व विरोधी पक्षांतर्फे येत्या २६ जानेवारीस मुंबईत काढण्यात येणाºया ‘संविधान बचाव मोर्चा’च्या तयारीसाठी बुधवारी दुपारी दोन्ही काँग्रेसचे नेते व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते

कोल्हापूर : सर्व विरोधी पक्षांतर्फे येत्या २६ जानेवारीस मुंबईत काढण्यात येणाºया ‘संविधान बचाव मोर्चा’च्या तयारीसाठी बुधवारी दुपारी दोन्ही काँग्रेसचे नेते व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांची भेट झाली. विरोधी पक्षनेते राधाकृ ष्ण विखे-पाटील यांच्या बंगल्यात ही भेट झाली; परंतु त्यामध्ये अन्य कोणतीच अथवा राजकीय चर्चा झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

संविधान मोर्चा नेमका कसा असावा, याचे नियोजन करण्यासाठी झालेल्या बैठकीत विरोधी पक्षनेते विखे-पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड व खासदार शेट्टी उपस्थित होते. या मोर्चाला दि. २६ रोजी मुंबई विद्यापीठासमोरील आंबेडकर पुतळ्यापासून सुरुवात होईल. तो गेटवे आॅफ इंडियासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर येईल. तिथे दोन तास धरणे आंदोलन होईल. हा मोर्चा कुण्याही एका पक्षाचा नाही. ‘संविधान बचाव’ अशी भूमिका असलेले सर्व समाजांतील व सर्व स्तरांतील लोक त्यामध्ये सहभागी होऊ शकतील. त्याला कोणीही एक नेता नाही, एक पक्ष नाही, की एक झेंडा असणार नाही. त्यामध्ये कोणतीही घोषणाबाजी होणार नाही किंवा एकही नेता तिथे भाषणबाजी करणार नाही, अशी आचारसंहिता या बैठकीत निश्चित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.खासदार शेट्टी हे केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या आघाडीतून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या २०१९ च्या निवडणुकीसाठी भाजपविरोधात देशव्यापी एकजूट करण्याच्या हालचाली सुरू आहेत. शेट्टी यांच्या संघटनेचीही ताकद आता महाराष्ट्रभर वाढली आहे. भाजपला विरोध करणारे शेट्टी हे अन्य पक्षांपासून समान अंतरावर राहणार असल्याचे सांगत असले तरी ते निवडणुकीपर्यंत काहीतरी राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्या घडामोडींची पार्श्वभूमी तयार होण्यासाठी ‘संविधान मोर्चा’च्या निमित्ताने होत असलेली एकजूट कारणीभूत ठरू शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.मुंबईत बुधवारी विरोधी पक्षनेते राधाकृ ष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विखे-पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांची बैठक झाली. संविधान मोर्चाच्या तयारीची चर्चा या बैठकीत झाली.